जिल्हा

भिवंडीत शेअर ट्रेडिंगच्या नावाखाली २२ लाखांची फसवणूक

भिवंडीत शेअर ट्रेडिंगच्या नावाखाली २२ लाखांची फसवणूक
भिवंडीत शेअर ट्रेडिंगच्या नावाखाली २२ लाखांची फसवणूक फोटो: ठाणे वैभव

भिवंडी: भिवंडीत शेअर ट्रेडिंगमधून मोठा नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवून २१ लाख ८२,४६२ रुपयांची ऑनलाइन फसवणूक झाल्याची घटना समोर आली आहे. शांतीनगर पोलिसांनी दोन मोबाईल धारकांसह अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी शोएब अहमद अब्दुल गनी मन्सुरी (३१) हे शहरातील गैबीनगर येथे राहत असून ते खाजगी क्षेत्रात नोकरी करतात. १४ जुलै २०२६ रोजी सकाळी १०:३० वाजता त्यांनी गुगलवर "free AI for stock market" (शेअर मार्केटसाठी मोफत एआय) असा शोध घेतला. या दरम्यान, त्यांना एका वेबसाइटची लिंक मिळाली आणि त्याद्वारे त्यांना "62 BNP Paribas Finance Discussion Room" नावाच्या व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये सामील करून घेण्यात आले.

तक्रारीनुसार, या ग्रुपमधील सदस्यांनी एका बनावट ट्रेडिंग साइटद्वारे केलेल्या गुंतवणुकीवर २०० ते ३०० टक्के परतावा मिळण्याचे आमिष दाखवले आणि मुद्दल रक्कम कधीही परत काढता येईल अशी खात्री दिली. या प्रलोभनाला बळी पडून शोएब यांनी आरोपींनी सांगितलेल्या खात्यांवर विविध तारखांना एकूण २१,८२,४६२ रुपये हस्तांतरित केले. जेव्हा त्यांनी नफा आणि मुद्दल रक्कम परत मागितली, तेव्हा त्यांना समोरील लोकांकडून टाळाटाळीची उत्तरे मिळाली. त्यावरून आपली फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. शांतीनगर पोलिसांनी अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलीस सध्या बँक खाती आणि व्यवहारांच्या तपशीलांची तपासणी करत असून, पोलीस निरीक्षक दीपक बार्गे या प्रकरणाचा तपास करत आहेत.

संबंधित बातम्या

Advertisement ADVERTISEMENT 300x475

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
Advertisement ADVERTISEMENT 300x475